पेण : प्रतिनिधी
भाजपच्या पेण तालुका मंडल अध्यक्षपदी श्रीकांत पाटील (सर) यांची निवड करण्यात आली. भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असून या अनुषंगाने पेण तालुका मंडल अध्यक्षपदाची निवडणूक आमदार रविशेठ पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी निवडणूक अधिकारी विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. तालुकाध्यक्षपदासाठी श्रीकांत पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विनोद साबळे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर आमदार रविशेठ पाटील, ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, अनंत पाटील, शिवाजी पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब जोशी, भास्कर पाटील, मच्छिंद्र पाटील, अशोक पाटील, जितू पाटील आदींनी श्रीकांत पाटील यांचे अभिनंदन केले.