Breaking News

भाजप महाड तालुकाध्यक्षपदी जयवंत दळवी बिनविरोध

महाड : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्ग निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. 15) महाड तालुका अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी जयवंत शशिकांत दळवी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस आणि निवडणूक निरीक्षक राजेश मपारा यांनी जयवंत दळवी यांची महाड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, या बैठकीत स्वा. सावरकर यांचा अवमान केल्याबद्दल काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.

भाजपच्या महाड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल निवडणूक निरीक्षक राजेश मपारा, बिपीन महामुणकर, राजेय भोसले यांनी जयवंत दळवी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपच्या महाड तालुका अध्यक्षपदाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, अलिबाग विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष महेश शिंदे, संदीप ठोंबरे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय ताडफळे, महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी वाझे, सरपंच प्राजक्ता दळवी, नाना महाले आदी पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीयत्व कायदा आणि स्वा. सावरकर अवमानप्रकरणी शिवसेनेची भूमिका संभ्रमाची आणि संशयाची असून सत्तेपुढे त्यांना याचा विसर पडला असल्याची टीका नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांनी या वेळी केली.

दरम्यान, महेश शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान केल्याबद्दल राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. त्याला अनुमोदन देत अ‍ॅड. आदित्य भाटे यांनी गांधी यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी यांना देण्याच्या सूचना केल्या.

भाजप सरकारने सुरू केलेल्या महाडमधील हजारो कोटींच्या विकासकामांना जर ठाकरे सरकारने स्थगिती दिली, तर आपण रस्त्यावर उतरून आंदोन करू.

-जयवंत दळवी, अध्यक्ष, महाड तालुका भाजप

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply