पनवेल : वार्ताहर : पनवेल महापलिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील नालेसफाईचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी हॉटेल पंचरत्नसमोरील नाल्याजवळून करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन प्रभाग समिती डचे अध्यक्ष राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पनवेल महापलिकेचे सहाय्यक आयुक्त शाम पोशेट्टी, नगरसेवक अनिल भगत, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लवकरच प्रभाग क्रमांक 19़ मधील नालेसफाई जोरदारपणे करण्यात येईल, असे आश्वासन राजू सोनी यांनी या वेळी दिले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …