Sunday , June 4 2023
Breaking News

कामोठेमध्ये वीज ग्राहकांना अवास्तव बिल

महावितरणचा भोंगळ कारभार

कामोठे : रामप्रहर वृत्त : कामोठेमध्ये वीज ग्राहकांना अवास्तव बिल येऊ लागल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे.   सेक्टर 10 येथील विक्रम सोसायटीच्या गाळा नं 10 मध्ये भाजीचे दुकान आहे. त्या दुकानात तीन दिवे आणि एक पंखा आहे. दुपारी तसेच रात्री त्याचा वापर नसतो. असे असताना महावितरण कंपनीने या गळ्याला 63 हजार 540 रुपये वीज बिल पाठविले आहे. या बिलावर 4598 एवढे रिडिंग दाखविण्यात आले होते. याबाबत सिटिझन युनिटी फोरमच्या रंजना साडोलिकर एकता सामाजिक संस्थेच्या वतीने उषा डुकरे यांनी आवाज उठवला, त्यामुळे हे बिल महावितरणने कमी केले, परंतु याच इमारतीत 12 नंबरच्या गाळ्यात कपड्याच्या इस्त्रीचे दुकान आहे. संबंधिताला गेल्या महिन्यात महावितरणकडून 58 हजार रुपये बिल पाठविले आहे. त्याने 4518 युनिट वीज वापरल्याचे या बिलात नमूद आहे. या ग्राहकाचे बिल मात्र कमी करण्यात आले नाही. त्यानुसार बुधवारी उषा डुकरे आणि अल्पेश माने यांच्यासह काही महिला महावितरणच्या खांदा वसाहतीतील उपविभागीय कार्यालयात गेले. त्या बिलासंदर्भात विचारणा केली असता, या ठिकाणी तेवढा विजेचा वापर झाला असेल,  सूर्यतल आणि पारंगे यांनी सांगितले. यावर रिडिंग दाखवा, असे विचारले असता उपलब्ध नसल्याचे म्हणाले.तसेच बिल भरावे लागेल अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असेही ते म्हणाले.

खाजगी एजन्सीकडून अचूक रिडिंग घेतले जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना अर्ध्या लाखांपेक्षा जास्त बिले पाठवली जातात. आम्ही विक्रम सोसायटीतील गाळ्यांना आलेल्या बिलांबद्दल विचारणा केली असता, हा वापर वर्षभरात झाला आहे. त्यामुळे इतकी रक्कम भरावीच लागेल असे सांगण्यात आले. यावर रिडिंग दाखवा, असे विचारले असता तांत्रिक बिघाडामुळे ते शक्य नाही, असे ते उत्तरले.

-उषा बिभिषण डुकरे खजिनदार, कामोठे  शहर महिला मोर्चा, भाजपा

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply