रेवदंडा : प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभासदांसाठी रेवदंड्यातील डॉ. विजय वरसोलक यांच्या रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संस्था व रेवदंडा-चौल डॉक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरात रक्तशर्करा तपासणी, युरिक अॅसिड व हिमोग्लोबीन तपासणी, डायबिटीस तपासणी व उपचार करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय वरसोलकर, संघाचे अध्यक्ष सुभाष चिटणीस, अशोक देवधर, विलास घोसाळकर आदी पदाधिकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला विविध औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.