Breaking News

श्रीराम लागू यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, ‘नटसम्राटा’ला मान्यवरांची श्रद्धांजली

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि. 17) रात्री वृद्धत्वाने निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने रंगभूमी व सिनेसृष्टीतून शोक व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. लागू यांच्याप्रति आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

डॉ. श्रीराम लागू यांनी ’सामना’, ’सिंहासन’, ’पिंजरा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ’नटसम्राट’ नाटकातील त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. अमेरिकेत असलेला मुलगा आल्यानंतर शुक्रवारी (दि. 20) डॉ. लागू यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply