पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभास स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, जयवंतराव देशमुख, प्राचार्य साधर्ना डोईफोडे, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णूके, संस्थेचे आजीव सदस्य प्रमोद कोळी, अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख रवींद्र भोईर, सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर, सर्व सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाच्या स्काउट्स व गाईड्स यांनी खरी कमाई उपक्रमांतर्गत लावलेल्या खाद्यपदार्थ स्टॉल्सचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अरुणशेठ भगत यांनी उद्घाटनपर भाषणात विद्यार्थ्यांना खेळांच्या माध्यमातून मन, मनगट मजबूत करण्यासोबतच शिस्त, अनुशासन व संयम या गुणांचा परिपोष करून विविध क्रीडाप्रकारांमध्ये उत्तुंग झेप घ्यावी, असे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर रंधवे व ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले.
Check Also
महापालिका कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …