Thursday , March 23 2023
Breaking News

दुष्काळग्रस्तांसाठी आकस्मिकता निधीत दोन हजार कोटींची वाढ

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात 2018च्या खरीप हंगामातील नैसर्गिक परिस्थितीमुळे 151 तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांना शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी दोन हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीच्या 150 कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत दोन हजार कोटींनी तात्पुरती वाढ करून ती दोन हजार 150 कोटी इतकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील 151 तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकर्‍यांना शेती पिकाच्या नुकसानीबद्दल तातडीने मदत वाटप करण्यासाठी दोन हजार कोटी इतका अतिरिक्त निधी आकस्मिक निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यानुसार मंगळवारी

(12 फेबु्रवारी) निर्णय घेण्यात आला.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply