चिरनेर : प्रतिनिधी
रायगड जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटना संचलित, आचार्य अत्रे कट्टा कार्यक्रम नुकताच उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व कट्ट्याचे अध्यक्ष धनंजय गोंधळी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय गायकवाड हे उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणार्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये हरिश्चंद्र माळी यांचा स्व.भ.ल.पाटील काव्यभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, राजेंद्र नाईक व ए.डी.पाटील यांना दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या साहित्य स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळाल्याबद्दल, कवी विराम उपाध्ये यांना रायगड तोफदिवाळी अंकाचा स्व.प.शि. म्हात्रे काव्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक सचिव रा.उ.म्हात्रे यांनी केले. प्रकाश ठाकूर, काशिनाथ मढवी, जे. एस. घरत, हरिभाऊ घरत, सुयोग गायकवाड, संघश्री गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले.