पनवेल : विहीघर येथे साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, मंगेश फडके यांचा वाढदिवस समारंभ आणि कुस्त्यांच्या दंगलींचे पंढरीशेठ फडके यांनी आयोजन केले होते. या सोहळ्याला सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, स्नेहल खरे, मंगेश फडके आदी उपस्थित होते.
भालचंद्र म्हस्कर, भास्कर म्हस्कर यांचा वाढदिवस
सावळे (ता. पनवेल) : भाजप कार्यकर्ते भालचंद्र हसुराम म्हस्कर व भास्कर हसुराम म्हस्कर यांना वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या.