Breaking News

दीक्षा घेणार्या आकाश पारलेचाची कर्जतमध्ये मिरवणूक

कर्जत : प्रतिनिधी

कामशेत येथे राहणारा आकाश किरणराज पारलेचा हा 27 वर्षाचा कॉम्प्युटर इंजिनियर असलेला युवक सर्वस्वाचा त्याग करून दीक्षा घेणार आहे. त्याची बहीण कर्जतला असल्याने कर्जत शहरातून त्याची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचा सन्मान करण्यात आला. आकाश उच्च शिक्षित असूनही त्याच्या आईचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडील आणि आजी सोबत कामशेत येथे तो रहात होता. त्याने सर्वस्वाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. तो 18 जानेवारी रोजी सुरत येथे दीक्षा घेणार आहे. त्याची बहीण नयना श्रेणीक ओसवाल ही कर्जतला असल्याने येथील जैन बांधवांनी त्याचा सन्मान करण्याचे ठरविले. सकाळी साडे नऊच्या सुमारास आकाशची मिरवणूक रथातून वाजत गाजत कर्जत शहरातून काढण्यात आली. यावेळी त्याने कपडे, पैशाचे वाटप करून सर्व गोष्टींचा त्याग केला. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी रामदास कोकरे तसेच भाजपचे पुंडलिक पाटील, वसंत भोईर, पंढरीनाथ राऊत, राजेश भगत, सुनील गोगटे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर आदींसह नगरसेवक, जैन बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनतर जैन समाजाच्या वतीने आकाशचा सत्कार करण्यात आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply