Breaking News

चांगू काना ठाकूर विद्यालयात स्नेहसंमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळा समितीच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाचे डॉ. शुभदा नील आणि डॉ. मयुरेश जो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये ‘इंडीयन आयकॉन’ या विषयावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.

या स्नेहसंमेलनात अंतर्गत ‘इंडीयन आयकॉन’ या शिर्षका अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांनी मने जिंकली. या वेळी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, तर शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच या वेळी कलाकृती प्रदर्शनाचे डॉ. शुभदा नील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणुन पनवेल महापालिकेच्या नगरसेविका राजेश्री वावेकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक प्रकाश भगत, मुख्याध्यापिका इंदुमती घरत, संतोष चव्हाण, सुभाष मानकर, संध्या अय्यर, उज्वला कोटीयन, तसेच सीकेटी संकुलातील सर्व विभाग प्रमुखांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply