Breaking News

संस्थेला माझे पूर्ण सहकार्य राहील -आमदार महेश बालदी, युईएस स्कूल व कॉलेजचे स्नेहसंम्मेलन उत्साहात

उरण : वार्ताहर

मी या शाळेचा सेक्रेटरी होतो संस्था कशी चालते, खर्च किती असतो, शाळा चालविण्यासाठी व्यवस्थापनाला काय करावे लागते ते मला माहित आहे, या संस्थेत चांगले काम करतात माझ्या काढून या शाळेला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. उरण एज्युकेशन सोसायटी (युईएस) स्कूल व ज्युनिअर अ‍ॅण्ड सिनिअर  कॉलेजमध्ये शुक्रवारी (दि. 10) झालेल्या वार्षिक स्नेहसंमेनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

तसेच ते पुढे म्हणाले की, हि शाळा सर्वांची कशी वाटेल याकडे आपण सर्वांनी पर्यंत करूया, येणारा काळ बदलणारा आहे, आव्हाने बदलणारी आहेत, स्पर्धेच्या युगात चांगले शिक्षण महत्वाचे आहे, येथील शिक्षक वर्ग चांगले काम करीत आहेत. पालकांनी सध्या आपल्या मुलांकडे लक्ष देऊन मुलांचे पुढील भवितव्य उज्वल होईल त्याकडे लक्ष दिले पाहिजे.

व्यासपीठावरील नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे, अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, मानद सहसचिव चंद्रकांत ठक्कर, खजिनदार विश्वास दर्णे, विश्वस्त सदस्या व माजी प्राचार्या  स्नेहल प्रधान, विश्वस्त सदस्य व माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र भानुशाली ह्या सर्व मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या सोबत सिनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, सिनियर कॉलेजचे एचओडी व प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी नगरसेवक कौशिक शहा, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक धनंजय कडवे, नगरसेविका रजनी कोळी, नगरसेविका शेलार, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेविका यास्मिन गॅस, पालक, विदयार्थी, पी. टी. ए. सदस्य, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिमरन दहिया यांनी पीपीटीद्वारे वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर सिनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य गिरीश कुडव यांनीही पीपीटीद्वारे वार्षिक अहवाल सादर केला. युईएसचे मानद सचिव आनंद भिंगार्डे तसेच अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन यांनीही आपल्या भाषणातून शाळा व कॉलेजचा प्रगती आलेख व भविष्यात साध्य करावयाची  उदिद्ष्टे याविषयी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पहिली ते अकरावीच्या विदयार्थ्यांनी केले.

विद्यार्थ्यांचे कौतुक

कार्यक्रमात परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त करणार्‍या शाळा व कॉलेजमधील सर्व अभ्यासू विदयार्थ्यांचे व सर्व गुणवान विद्यार्थ्यांचे व त्यांच्यावर मेहनत घेणार्‍या सर्व शिक्षक, शिक्षकेत्र कर्मचार्‍यांचे प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन कौतुक करण्यात आले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply