Breaking News

केळवणेमधील बहिणी पुरस्काराने सन्मानित

पनवेल : प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या सारडे उरण येथील गोपाळ दिनकर म्हात्रे, केळवणे येथील अमिता अरुण घरत व अमिषा अरुण घरत यांना मराठी राज्यभाषा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई परेल येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारक येथे जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र व काव्य महासंघ या संस्थेने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणार्‍यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. त्या सोहळ्यात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या गोपाळ दिनकर म्हात्रे, अमिता अरुण घरत व अमिषा अरुण घरत यांना मराठी राज्यभाषा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.  पुरस्कार वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे डॉ. सागर नटराज, प्रसिद्ध नृत्य दिगदर्शक, माजी आमदार अजय भाऊ चौधरी, प्रसिद्ध कवी मकरंद वागणेकर, जय महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष प्रकाश जाधव, प्रसिद्ध कवयत्री सुवर्णा जाधव, सरचिटणीस जय महाराष्ट्र पत्रकार संघ सूरज भोईर, कवी विलास देवळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी केळवणे गावातील अमिता आणि  अमिषा अरुण घरत या दोन बहीणींना मराठी राज्यभाषा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply