Breaking News

महसूल वसुलीत कोकण विभागाची कसरत

पनवेल ः बातमीदार

कोकण विभागाने सरत्या आर्थिक वर्षातील महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या विभागाने 1035 कोटींचा महसूल वसूल केला आहे. विशेष म्हणजे होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता शासकीय तिजोरीवर ताण पडू नये या उद्देशाने या विभागाला या सरत्या वर्षात 2534 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

राज्यातील एकूण महसुली विभागापैकी कोकण विभागाकडून सर्वाधिक महसूल जमा होतो. राज्याच्या महसूल विभागातर्फे एकूण महसूल वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट साधारण सात हजार 500 कोटींच्या घरात आहे. यातील जवळपास 40 टक्के महसूल हा कोकण महसूल विभागाकडून राज्याच्या तिजोरीत जमा केला जातो. कोकण महसुली विभागात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण महसूल विभागातून हे उत्पन्न जमीन महसूल, वाळू, माती, गौण खनिज उत्खनन, शिक्षण कर, रोजगार कर आदी बाबीतून वसूल करण्यात येतो. दरम्यानच्या काळात वाळू लिलाव थंडावल्याने महसूल वसुलीचा वेग मंदावला होता, मात्र वाळू लिलावाला सध्या सुरुवात झाल्याने महसूल वसुलीचा वेग वाढला आहे. सप्टेंबर 2018पर्यंत 415 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापैकी उर्वरित रक्कम अवघ्या पाच महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी 2019पर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट कोकण विभागातील अधिकारी-कर्माचार्‍यांसमोर होते, परंतु हे उद्दिष्ट पूर्ण करताना या विभागाला कसरत करावी लागली. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत अडीच हजार कोटींपैकी केवळ 1035 कोटी महसूल गोळा करण्यात या विभागाला यश आले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply