
मोहोपाडा : प्रतिनिधी
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील शेडुंगजवळील सेंट विल्फ्रेड्स कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटरकॉलजिएट नृत्य व गाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जी. डी. बढाया ऑडीटोरियम सभागृहात घेण्यात आली. या वेळी खालापूर व पनवेल तालुक्यातील 49 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यदिग्दर्शक अभिनेता भरत जाधव, गायक मयुरी कांडपेकर आणि विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध ऋषी यांच्या हस्ते करण्यात आली. मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. परीक्षक म्हणून भरत जाधव यांनी काम पाहिले. यात सोलो डान्स स्पर्धेत प्रथम आदिती सालवी (यशवंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज, चौक), द्वितीय राज कांबळे (सेंट विल्फ्रेड्स फार्मसी कॉलेज), तृतीय मयूर लोखंडे, ग्रुप नृत्य स्पर्धा प्रथम पूजा माने व ग्रुप (यशवंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज चौक), द्वितीय साक्षी पवार व ग्रुप (यशवंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज), तृतीय हर्षाली भोसले व ग्रुप (पी.एन. पी. वावोशी स्कूल) आदींनी आपापली कला सादर करून पारितोषिके पटकावली. संस्थेचे सचिव डॉ. केशव बढाया यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तपस्या पाटील, सु. बी. नरगीस, सोहेल पटेल, सिमरन जैन व कौस्तुभ यांनी अथक परिश्रम घेतले.