Monday , February 6 2023

निधी चौधरी रायगडच्या नव्या जिल्हाधिकारी

अलिबाग : प्रतिनिधी

निधी चौधरी यांनी रायगड जिल्हाधिकारीपदाचा पदभार बुधवारी (दि. 22) स्वीकारला. चौधरी या 2012च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

चौधरी यांनी मुंबई महापालिकेत उपायुक्त, उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी त्यांनी रायगड जिल्ह्यात पेण प्रांताधिकारी म्हणून कामकाज हाताळले आहे.

आयएएस अधिकारी होण्यापूर्वी 2008मध्ये रिझर्व्ह बँकेतही चौधरी यांनी काम केले आहे. त्या नागौर जिल्ह्यातील डीडवानाच्या रहिवासी असून जयपूरमध्ये त्यांचे उच्चशिक्षण झाले. राजस्थान विद्यापीठातून त्यांनी लोकप्रशासन विषयात पीएचडी पदवी संपादित केली आहे. राज्यात सध्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्याच अनुषंगाने डॉ. सूर्यवंशी यांच्या जागी चौधरी यांची रायगड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply