शिवजयंती उत्सवानिमित्त कोपर फाटा येथे बैठक

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा उभारणी व सुशोभिकर समिती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण विभागाच्या वतीने शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमिवर शनिवारी (दि. 4) बैठक कोपर फाटा येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थलांतरीत करण्याबाबत तसेच परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत शिवजयंतीअगोदर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत आमदार महेश बालदी यांच्यसमवेत बैठक घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या 19 फेबु्रवारी रोजी साजरी होणार आहे. या उत्सवाची पूर्वतयारी करण्यासंदर्भात शनिवारी कोपर फाटा येथे बैठक झाली. या बैठकीला उद्योजक जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी भाऊशेठ पाटील, वाहतूक सेलचे जिल्हा उपाध्यक्षक हेमंत ठाकूर, वसंतशेठ म्हात्रे, रघुनाथ घरत, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, सदस्य सचिन घरत, योगीता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, नंदा ठाकूर, उषा ठाकूर, अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, किशोर पाटील, वी.के.ठाकूर, पी. के. ठाकूर, भार्गव ठाकूर, रामदास ठाकूर, कमलाकर घरत, संजय भगत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply