Wednesday , February 8 2023
Breaking News

दिघाटीत श्रीगणेश जन्मोत्सव सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील दिघाटी येथील श्रीगणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली होती. नवतरुण गणेश मित्र मंडळातर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त दिघाटी येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही तीन दिवस काकडा, हरिपाठ, कीर्तन, अभिषेक आदी झाले. मंगळवारी सकाळी 9.30 वा. माजी सरपंच अण्णा पाटील व पुंडलिक ठाकूर (खिडूकपाडा) यांच्या हस्ते कलशपूजन, दिघाटी सरपंच अमित पाटील यांच्या हस्ते अभिषेक, तर नारायण म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. सकाळी 10.30 वा. हभप मुक्ताताई पाटील यांचे श्रीगणेश जन्माचे कीर्तन झाले. या वेळी माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील, ज्येष्ठ नेते हिरामण ठाकूर, चांगाजी पाटील, प्रमोद पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, स्मिता ठाकूर, वैशाली पाटील, अक्षता म्हात्रे, हर्षदा पाटील, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, भीमकांतशेठ पाटील (कासारभट), बळीराम ठाकूर, कैलास पाटील, पुंडलिक पाटील, अर्जुन पाटील, अशोक पाटील, रामभाऊ पाटील, संदीप पाटील, मच्छिंद्र पाटील, विकास पाटील, गजानन पाटील, सिकंदर म्हात्रे, रवींद्र पाटील, नंदकुमार पाटील, लक्ष्मण ठाकूर, विनोद ठाकूर, सुबोध ठाकूर, श्याम पाटील, अनिल पाटील यांसह भाविक उपस्थित होते. सायंकाळी बापूजी देव प्रासादिक भजन मंडळाचा हरिपाठ झाला. रात्री श्री गणेश प्रासादिक नवतरुण मंडळाचे भजन व 10 वाजता श्रींची पालखी मिरवणूक झाली. दरम्यान, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांनी या उत्सवास भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply