गावात सॅनिटायझर फवारणी; रुग्णांच्या कुटुंबीयांना मदत
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) हद्दीत कोविड 19च्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रथम संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली, तसेच गावातील रुग्णांना धीर देत, त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून ग्रामपंचायतीने मोफत किराणा सामान व धान्य वितरण करण्यास सुरुवात केली आहे.
या समाजाभिमुख कार्याबद्दल बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर (भाजप) व ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत. बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, उपसरपंच तथा सदस्य सुजित म्हात्रे, भावना पाटील, देवानंद पाटील, रितेश ठाकूर, मिनाक्षी म्हात्रे, संदेश म्हात्रे, राजश्री पाटील, शुभांगी ठाकूर, करिष्मा म्हात्रे, अच्युत ठाकूर, जागूती घरत, ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे यांनी सामाजिक हित लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे कार्य केले जात आहे.
प्रथम संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली, तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबीयांना मदत, सहकार्य म्हणून मोफत तांदूळ 10 किलो, मुगडाळ दोन किलो, साखर पाच किलो, चहा पावडर पाव किलो, सुंठ, मीठ, खोबरे अर्धा किलो, गोडेतेल दोन किलो, कांदे पाच किलो, बटाटे पाच किलो, लसूण अर्धा किलो, निरमा साबण सहा नग, डेटॉल साबण पाच नग, बिस्कीट पुडे 10 नग, आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.