नवी दिल्ली ः पुलवामा येथील दलीपोरात सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुलवामात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुलवामातील दलीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त टीमला मिळाल्यानंतर काल पहाटे जवानांनी या भागाला घेरले. जवानांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दरम्यान, फायरिंग थांबली असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. गेल्या रविवारीही काश्मीरमधील शोपियात सुरक्षा दल व दहशतवाद्यांत चकमक उडाली होती. त्यावेळी दोन दहशतवादी ठार झाले होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …