उरण : प्रतिनिधी
उरण-पनवेल रोडवरील जेएनपीटी वसाहत ते नवघरफाटा दरम्यान गुरुवारी (दि. 30) सकाळी एमआयडीसीची पाण्याची 24 इंचाची पाईपलाइन फुटून लाखो लिटर्स पाणी वाहून गेले. दोन तास दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे उरणकरांना पाण्यासाठी दुरुस्ती होईपर्यंत वाट पाहावी लागली. थंडीमुळे वेल्डींगला तडा गेल्याने पाईपलाईन फुटली असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रंजित बिरंजे यांनी दिली. फुटलेली पाण्याची पाईपलाईन दोन तासातच दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्ती दरम्यान दोन तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता अशीही माहिती बिरंजे यांनी दिली.