Breaking News

‘ते’ फलक सुधारले

पनवेल भाजप युवा मोर्चाची तत्परता

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल ते पनवेल शहराला जोडण्याकरिता पोदी येथे नव्याने भुयारी मार्ग सुरु करण्यात आला आहे. परंतु मार्गावर जुना पनवेल हे नामफलक लावण्यात आले असून, भारतीय जनता पार्टी युवामोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 1) याचा निषेध करीत पनवेल असा उल्लेख असलेले नामफलक लावले. या वेळी युवानेते मयुरेश नेटकर या संदर्भात माहिती दिली.

पनवेल हे ऐतिहासिक शहर असून इतिहासात त्याचे अनेक दाखले मिळतात पनवेल येथे मोठी बाजारपेठ भरत असे, अनेक तलाव येथे आहेत. येथे राहणार्‍या लोकांना देखील याबद्दलचा सार्थ अभिमान आहे. परंतु पनवेल येथील पोदीजवळ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने नव्याने तयार झालेल्या भुयारी मार्गाजवळ नवीन पनवेल ते पनवेलकडे जाणार्‍या रस्त्याला प्रशासकीय अधिकार्‍यांच्या संकुचित वृत्तीमुळे दिशा दर्शवणार्‍या सूचना फलकावर जुने पनवेल (ओल्ड पनवेल) असा चुकीचा उल्लेख केला आहे, यामुळे पनवेलच्या नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही चळवळ सुरू केली होती की पनवेलला ‘जुने’ संबोधू नका बर्‍याच ठिकाणी याची सुधारणा देखील झालेली. परंतु या फलकांमुळे पनवेलकरांची भावना दुखावली असून यापुढे अशी पनवेलच्या उल्लेखात चूक होऊ नये अशी विनंती युवा नेते मयुरेश नेतकर यांनी केली. या वेळी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, उपाध्यक्ष प्रितम म्हात्रे, विवेक होन, आभा जोशी, विराज वाघीलकर, आयुफ अकुला, तेजस जाधव, परेश बोरसे, किरण जाधव, अक्षय सावंत, महेश कांबळे, अक्षय तुपे, उमेश कांबळे, अनिकेत जाधव, विनोद पवार, प्रविण कांबळे यांच्या समवेत युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहरतेय पनवेल शहर

पनवेल शहर बहरते आहे, नव्याने होणारी वस्ती नवीन पनवेल असू शकते पण आधीपासून वसलेले शहर जुने कसे होऊ शकते? पनवेलला स्वतःची ओळख आहे मोठ्या बाजारपेठेसह येथे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आहे, तालुका क्रीडा संकुल येथे आहेत, मोठे मोठे रस्त्यांचे काँक्रीटीकरण झालेले आहेत, वडाळे तलाव सुशोभीकरण व मोठे गार्डन तयार होत आहे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे शहर बहरत आहे, परंतु बर्‍याच ठिकाणी पनवेल शहराचा जुने अथवा ओल्ड असा उल्लेख करण्यात येतो याची खंत त्यांना देखील होते, बर्‍याच वेळा त्यांनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply