पेण : प्रतिनिधी
स्वच्छतेचा संदेश घरोघरी जावा या उद्देशाने पेण नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि. 2) मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विविध गटातील मुले, मुली, महिला, पुरुषांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या गटात करण माळी व ऋतुजा सकपाळ यांनी बाजी मारली.
या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सागर ओक यांच्यासह नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, विविध सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित, धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत 1500 ते 1600 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी अर्चना दिवे, प्रशासन अधिकारी राजाराम नरूटे, सामान्य प्रशासन विभागप्रमुख भरत निंबरे, आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण, भांडार विभागप्रमुख आबासाहेब मनाळ, पाणीपुरवठा अधिकारी रमेश देशमुख, कर व शुल्क विभागप्रमुख शेखर अभंग, बांधकाम विभागप्रमुख अमित शेळके, आस्थापना विभागप्रमुख उमंग कदम, प्रशांत ढवळे आदींसह कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
गटनिहाय निकाल (पहिले तीन) 12 ते 14 (3 किमी) मुले : महेंद्र जान्या पारधी, अंकित अनिल सकपाळ, सोहम रामचंद्र म्हात्रे, मुली : मयुरी नितीन चव्हाण, मनाली नरेश गुंजावळे, परिणिता राजेंद्र मोकल, 15 ते 17 वयोगट (5 किमी) मुले : मिलिंद महादू निरगुडे, मृणाल मनोहर सरोदे, हिरामण जोमा गडबळ, मुली : प्रतीक्षा प्रदीप कुळये, रोशनी राजेंद्र पाटील, भावेश्री रवींद्र पाटील, 18 ते 20 (7 किमी) मुले : शुभम विकास मढवी, धीरेंद्र बाबूलाल चौधरी, शरद लक्ष्मण तांबोळी, मुली : स्वप्नाली बाळकृष्ण म्हात्रे, सायली विष्णूदास पाटील, कोमल सुभाष पेरवे, 21 वर्षांवरील (10 किमी) मुले : करण हरिश्चंद्र माळी, रामू गणपत पारधी, दीपक उपेंद्र सिंग, मुली : ऋतुजा जयवंत सकपाळ, दर्शना दत्तात्रेय पाटील, अस्मिता धनाजी पाटील, 50 वर्षांवरील (3 किमी) पुरुष : चंद्रकांत हरि पाटील, कैलास श्रीराम पाटील, संदीप गोपाळ मढवी, महिला : संध्या निलेश कडू, सुषमा चंद्रकांत पाटील, पद्मावती गजानन पाटील.