Breaking News

हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. ‘इतकी वर्षे मुंबईकरांसोबत बनवाबनवी करणारे हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर’ असा निशाणा शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे लगावला आहे.

आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 2) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईकरांना 24द7 तास पाणी देऊ, अशी

फेकमफाक करणार्‍यांनी 24द7 बार उघडे केले. गेले तीन दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर त्यांनी बोलण्यात काय अर्थ! एवढी वर्षे मुंबईकरांसोबत अशी ही बनवाबनवी सुरू आहे. हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर, असा टोला शेलार यांनी लगावला. मुंबई विद्यापीठाच्या अधिकार्‍यांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी असे दोन दिवस नेहमीप्रमाणे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी प्रशिक्षण झाले, मात्र दुसर्‍या दिवशी रद्द करण्यात आले. या प्रशिक्षणावर काँग्रेसने आक्षेप घेतला. ते रद्द करण्याची मागणी खेदजनक असून, पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक अस्पृश्यता दाखविणारे असल्याचा आरोप शेलार यांनी केला. या कृत्याचे तुम्ही समर्थन करणार नाही, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांच्याकडून शेलार यांनी व्यक्त केली. यापुढची प्रशिक्षणे मदरसे किंवा बार, रेस्टॉरंटमध्ये घ्यावीत, तसेच वैचारिक अस्पृश्यता असेल, तर याआधी संघ विचारांचे सरकार होते, त्यामुळे विधानसभेतील बाकेही धुवून- पुसून घ्यावीत, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply