अन्य देशांप्रमाणे भारतातही ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या वर्षभरात अॅमेझॉन व्हिडीओ आणि नेटफ्लिक्स अॅप्स चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी या अॅप्ससोबत करार केला आहे. वोडाफोनने सॅमसंगच्या नव्या फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलेक्सी एस10ई, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 सोबत करार केला आहे. या तीनही मोबाईल खरेदीवर वोडाफोन पोस्टपेड ग्राहकांना वर्षभरासाठी नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन फ्री देणार आहे. या सब्सक्रिप्शनची किंमत सहा हजार रुपये इतकी आहे. वोडाफोन कंपनीने ही ऑफर नवीन आणि जुन्या अशा दोन्ही ग्राहकांना दिली आहे. ही ऑफर केवळ पोस्टपेड नाही, तर प्री-पेड ग्राहकांसाठी सुद्धा आहे. वोडाफोनच्या प्री-पेड ग्राहकांसाठी 12 महिन्यांसाठी दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. या ऑफरची संधी घेण्यासाठी वोडाफोनच्या ऑनलाईन स्टोअरमधून गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई फोन खरेदी करावा लागणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस10 ची भारतात 66 हजार 900 रुपये किंमत आहे. गॅलेक्सी एस 10 पल्सची किंमत 73 हजार 900 रुपये इतकी आहे. गॅलेक्सी एस 10 ईची किंमत 55 हजार रुपये इतकी आहे.
Check Also
पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …