Breaking News

सरपंच दत्तात्रय सांबरी यांनी स्वीकारला पदभार, बिपीन बडेकर उपसरपंचपदी

कर्जत : बातमीदार

सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेले दत्तात्रय सांबरी यांनी सोमवारी (दि. 25) पदभार स्वीकारला. पंचायत समिती सदस्य प्रदीप ठाकरे आणि युवासेनेचे  संदीप बडेकर यांनी दत्तात्रय सांबरी यांना सरपंच पदाच्या खुर्चीत बसविले.

येत्या काही दिवसांत किरवली ग्रामस्थांना नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा मनोदय या वेळी सरपंच दत्तात्रय सांबरी यांनी व्यक्त केला. प्रदीप ठाकरे, संदीप बडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी उपसरपंच म्हणून बिपीन बडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य हिरामण गायकवाड, बबन गायकर, स्नेहा भोईर, आरती बडेकर, चित्रा पारधी, दर्शना भोईर यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे सभापती राहुल विशे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संघटक राजेश जाधव, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, तालुका संघटक करुणा बडेकर, माजी तालुका प्रमुख बालाजी विचारे, अक्षय पिंगळे आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply