Breaking News

भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका?

आयसीसीचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटमधील चुरस आणखी वाढवण्यासाठी नवीन नियम आणत आहेत. नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी तिसर्‍या अंपायरची मदत, जखमी खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी, आदी अनेक नवीन नियम सध्या पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी एका नियमाची भर पडली आहे व तो वर्ल्डकप स्पर्धेशी संबंधित आहे. त्यामुळे भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
आयसीसीच्या स्पर्धांसाठी भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया आदी संघ मोठ्या संख्येने सदस्य पाठवतात. त्यांच्या या सदस्यसंख्येवर आता चाप बसणार आहे. सदस्यसंख्या कमी करण्याचा विचार आयसीसी करीत आहे. आयसीसीच्या स्पर्धांसाठी सध्या 25 जणांच्या चमूला परवानगी आहे. ती कमी करून 23वर आणण्याची आयसीसीची तयारी आहे. यापूर्वी आयसीसीच्या
एका स्पर्धेसाठी इंग्लंडने 28 सदस्यीय संघ पाठवला होता.
भारतीय संघ 28 सदस्यांसह सध्या न्यूझीलंड दौर्‍यावर आहे. त्यात 15 खेळाडू, चार प्रशिक्षक, दोन नेट्समध्ये सरावाकरिता स्पेशालिस्ट, एक ट्रेनर, एक फिजिओ, दोन मसाजर, एक व्यवस्थापक, एक मीडिया मॅनेजर व एक लॉजिस्टीक मॅनेजर आहे. या नियमांची अंमलबजावणी दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्डकप स्पर्धेत करण्यात आली आहे व आगामी महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतही होणार आहे.  
नव्या नियमानुसार अतिरिक्त सदस्य संघासोबत असणार नाहीत तसेच त्या अतिरिक्त सदस्यांचा खर्च जरी क्रिकेट मंडळ करणार असले तरी आयसीसीने त्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला मोठा ताफा घेऊन जाता येणार नाही.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply