Breaking News

उमरठमध्ये गरजणार स्वातंत्र्याची सिंहगर्जना

उरण : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज्याचे सुभेदार यांच्या 350व्या पुण्यतिथी निमित्त उरण तालुक्यातील कळंबूसरे येथील आदर्श ग्रामोद्धार मंडळ निर्मित स्वातंत्र्याची सिंहगर्जना या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीचा प्रयोग उमरठ (ता. पोलादपूर) येथे सादर होणार आहे. पर्यायाने तान्हाजीच्या मातृभूमीत स्वराज्याच्या सिंह गर्जनेचे स्वर दुमदुमणार आहेत.

स्वराज्याचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या 350 पुण्यतिथी सप्ताहानिमित्त सोमवारी (दि. 17) त्यांची मातृभूमी उमरठ येथे स्वातंत्र्याची सिंह गर्जना या ऐतिहासिक कलाकृतीचा प्रयोग होत आहे. उरण तालुक्यातील कळंबूसरे गावातील आदर्श ग्रामोद्धार मंडळाची ही नाट्यनिर्मिती असून जनार्दन तोडणकर लिखित स्वातंत्र्याची सिंहगर्जनाचे दिग्ददर्शन वसंत

चिर्लेकर यांनी केले आहे.

या नाट्य कलाकृतीत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेत महेश भोईर, तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत संतोष पाटील, कान्होजी जेधेंच्या भूमिकेत सदानंद भेंडे, येसाजी कंकच्या भूमिकेत अशोक पाटील, साबाजीच्या भूमिकेत सिताराम भेंडे, जोत्याजीच्या भूमिकेत रविंद्र साटम, ज्योत्याजीची मुलगी गिरजेच्या भूमकेत नवी मुंबई येथील अलका परब, केसरसिंहच्या भूमिकेत वसंत भोईर, इस्माईल खानच्या भूमिकेत बळवंत गायकवाड, अब्दुल्ला अनंत म्हात्रे, मावळे संजय म्हात्रे, गुरुनाथ तांडेल, जगन्नाथ पाटील, सुहास म्हात्रे, अरब ऋषिकेश भेंडे, नरेश पाटील, जयवंत म्हात्रे हे कलाकार रंग मंचावर आपली कला सादर करणार आहेत.

उमरठच्या भूमीत स्वातंत्र्याची सिंहगर्जना दुमदुमणार असल्याने पोलादपूर वासीयांचे लक्ष याकडे लागले आहे. ही नाट्यकृती पाहण्यासाठी अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply