Breaking News

बचतगट व उद्योजक मेळाव्याला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा 2020 निमित्ताने बचतगट, व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या चर्चासत्र व परिचय मेळाव्याचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात येथे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपमहापौर जगदीश गायकवाड, उपआयुक्त जमीर लेंगरेकर, प्रसिध्द उद्योजक व-आय फोर इन्व्हेस्टमेंट प्ल्यनर्स प्रा. लि. चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक महेश चव्हाण, सुमा ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नारायण पाटील, सैफ रेहमान, विठ्ठल पाटील, शिवाजी देशमुख, मंजुषा परब आदी

उपस्थित होते.

उद्योजक चर्चासत्र व परिचय मेळाव्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 350 बचतगटाच्या महिला तसेच लहान-मोठ्या व्यवसायिक आणि उद्योजकांनी सहभाग घेऊन एकमेकांचा उद्योग उद्योगवाढीसाठी चर्चा केली. या वेळी सर्व शाळा, कॉलेजच्या सहाय्याने लोकशाही निवडणूक आणि सुशासन या विषयाच्या अनुषंगाने परिसरात मतदार नोंदणी व जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, जिंगर्ल्स स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांचा उपमहापौर जगदीश गायकवाड व उपआयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज, कामोठे, न्यू इंग्लिश स्कूल, कळंबोली, महात्मा स्कूल ऑफ अकॅडेमिक्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्स, ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, न्यू पनवेल, ज्ञानमंदिर, कळंबोली, रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल, कामोठे, पनवेल महानगरपालिका शाळा क्र. 7 तक्का (मराठी माध्यम), पनवेल, पनवेल महानगरपालिका शाळा क्र. 2 व 3 इत्यादी शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply