Breaking News

संतोष परदेशी यांना राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

उरण : रामप्रहर वृत्त
गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उरण येथील संतोष परदेशी यांनी गोळाफेकमध्ये सुवर्णपदक, तर हॅमर थ्रो या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. ही स्पर्धा वडोदरा येथील मंजलपूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाली.
संतोष परदेशी हे रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पनवेल तालुका आरोग्य विभागात सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले असून, त्यांना रायगडभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया व श्रीलंका असे दौरे यशस्वीपणे पूर्ण करून 2021मध्ये जपान सानसुई येथे होणार्‍या दहाव्या जागतिक मास्टर्स गेम्स या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, मात्र ते शासकीय सेवासुविधा, सवलती व आर्थिक मदतीपासून वंचित आहेत. तरीही त्यांनी वडोदरा येथील स्पर्धेत सुवर्ण व कांस्यपदक पटकाविल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply