सातारा : रामप्रहर वृत्त
सातारा येथे रयत सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन आणि अण्णासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण व उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 14) झाले.
या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, सचिव भाऊसाहेब कराळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रतिभा शरद पवार, नेहरू सायन्स सेंटरचे संचालक शिवप्रसाद खेणदे, राजीव गांधी सायन्स सेेंटरचे सल्लागार डॉ. अरुण सप्रे यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करिअर महोत्सव; विविध कार्यक्रमांची रेलचेल
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान अंतर्गत करिअर महोत्सवाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकेनेेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या महोत्सवात उद्योजकता व करिअर मार्गदर्शन, हस्तकला प्रदर्शन व खाद्य महोत्सव अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली.
