Breaking News

विहिरीत पडलेल्या भेकराला जीवदान

नागोठणे : प्रतिनिधी

विहिरीत पडलेल्या भेकराला दोन स्थानिक तरुणांनी जीवदान दिल्याची घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी सुधागड तालुक्यातील कुंभारशेत गावात घडली. नागोठणे विभागाच्या वन कर्मचार्‍यांनी या भेकरीला घनदाट जंगलात सोडून दिले.   कुंभारशेत गावातील विहिरीत शनिवारी सायंकाळी एक भेकर पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. दोन स्थानिक तरुणांनी  तातडीने भेकराला विहिरीबाहेर काढले. ग्रामस्थांनी हे भेकर पालीच्या वन कार्यालयाकडे जमा केले. मात्र, हा भाग नागोठणे वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पाली कार्यालयाकडून नागोठणे वन विभागाच्या कर्मचार्‍यांना पाचारण करून भेकराला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. नागोठण्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेकराची तपासणी करण्यात आली. त्यात भेकराला कुठेही दुखापत किंवा इजा झाली नसल्याचा अधिकृत निर्वाळा मिळाल्यानंतर रात्री या भेकराला पुन्हा घनदाट जंगलात सोडून दिले, अशी माहिती येथील वनाधिकारी किरण ठाकूर यांनी दिली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply