नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, वीरेंद्र सेहवाग, ब्रेट ली यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेत पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेसाठी भारत लेजंड्सचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पहिला सामना भारत लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स यांच्यात क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्या वानखेडे स्टेडियमवर 7 मार्च रोजी होणार आहे. असा असेल भारत लेजंड्स संघ : सचिन तेंडुलकर (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, जहीर खान, इरफान पठाण, अजित आगरकर, संजय बांगर, मुनाफ पटेल, मोहम्मद कैफ, प्रग्यान ओझा, समीर दिघे (यष्टीरक्षक), साईराज बहुतुले.