पनवेल ः रामप्रहर वृत्त
रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्या वतीने स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या गाण्यांची मैफल अर्थात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे रंगणार आहे.
सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात असे दिवाळी पहाटचे एक अनोखे नाते आहे. दिवाळीची पहाट सुरेल परंपरा जपायला मराठी रसिकांना आवडते. हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरतो. त्या अनुषंगाने सुरेल गाण्यांची मैफल असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
पनवेलमधील संगीतमय दिवाळी पहाटचे हे पाचवे वर्ष आहे. दर्जेदार कार्यक्रम तसेच उत्तम नियोजनामुळे या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची गर्दी होत असते. त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रवेशिका आवश्यक अनिवार्य असून ती नि:शुल्क आहे. अधिक माहिती व निःशुल्क प्रवेशिकांसाठी चिन्मय समेळ (8767149203), अभिषेक भोपी (9820702043), रोहित जगताप (8691930709), गौरव कांडपिळे (9920868008), आकाश डोंगरे (9930319832), सिद्धार्थ मोहिते (8879216669) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाने पनवेलच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे आणि हा दिवाळी पहाट कार्यक्रम त्या ठिकाणी प्रथमच होत असल्याने रसिकांच्या मनात कार्यक्रमाची उत्सुकता आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …