बर्लिन : वृत्तसंस्था
सन 2011चा विश्वचषक जिंकून भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचे सचिन तेंडुलकरचे स्वप्न साकार झाले होते. विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. क्षणाला 2000-2020 या कालावधील क्रीडाविश्वातील ‘कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन’ असा सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्ट्स वॉर्ड्सने सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आले आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये सचिन तेंडुलकरने स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली होती. यासाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील 20 दावेदारांना नामांकन होते. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला. टेनिस दिग्गज बोरिस बेकर यांच्या हस्ते चषक देऊन सचिनला सन्मानित करण्यात आले.