Breaking News

भाजपची कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाची पुढील दोन वर्षांसाठीची कार्यकारिणी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारीही निश्चित करण्यात आले असून, त्यांची नावे पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या वतीने तालुका सरचिटणीस राजेश भगत यांनी जाहीर केली आहेत.

भाजप कर्जत तालुका मंडळाची कार्यकारिणी तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी जाहीर केली. तालुका कार्यकारिणीत समाविष्ट सर्व पदाधिकारी हे भाजपच्या वतीने ज्या संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्यातून निवडण्यात आले आहेत. भाजप कर्जत तालुका उपाध्यक्षपदी गौतम मुंढे, सचिन म्हसकर, पंढरीनाथ पिंपरकर यांना संधी मिळाली, तर तालुका सरचिटणीस म्हणून राजेश भगत व पंकज पाटील यांची निवड झाली आहे. भाजप कर्जत तालुका चिटणीसपदी जीवन मोडक, नरेश भोईर, रूपेश वाघमारे, दर्शना बोराडे, प्रतिभा बारणे, सुनीता गुरव, तर खजिनदार म्हणून महेश घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी कर्जतमधील महिला कार्यकर्त्या स्नेहा गोगटे, तर भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली. भाजप ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्षपदी दशरथ पोसाटे, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्षपदी रवींद्र जाधव, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्षपदी राहुल मुकणे, भाजप अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्षपदी फुरकान कुरेशी, भाजप सांस्कृतिक सेल तालुका संयोजकपदी बल्लाळ जोशी, विधी सेल संयोजकपदी अ‍ॅड. अल्पेश कराळे, सोशल मीडिया सेल संयोजकपदी रमाकांत जाधव, दिव्यांग सेल संयोजकपदी अनिता रोकडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. भाजपच्या तालुका कार्यकारिणीत या वेळी मोठ्या प्रमाणात नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली. त्याचवेळी भाजपकडून जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून दीपक बेहेरे व जिल्हा चिटणीस म्हणून रमेश मुंढे यांना त्या त्या पदांवर कायम ठेवून पुन्हा संधी मिळाली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply