उरण : वार्ताहर
शेतकर्यांची फसवणूक करणार्या राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थगिती सरकारविरोधात उरण भाजपतर्फे येत्या मंगळवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धडक दिली जाणार आहे.
या वेळी शेतकर्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात उरण तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, गाव अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जि. प., पं. स. सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, महिला, युवक, कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयाजवळ (वैष्णवी हॉटेल) सकाळी 10 वाजता जमावे, असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी केले आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …