Breaking News

‘नवयुवक’तर्फे खांदा कॉलनीत आयोजित कार्यक्रमांना आ. प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनी येथील नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रतिमापूजन कार्यक्रम पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी सरपंच शशिकांत शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी रक्तदान शिबिर, विशेष व्याख्यान, तायक्वांदो डेमो आदी आयोजित कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेतला. आयोजित कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली तेव्हा आयोजक युवा नेते स्वप्नील भाऊ गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष प्रदिप देवकर, खजिनदार हर्षवर्धन शिंदे, सेक्रेटरी प्रशांत पवार, उपाध्यक्ष आदित्य गुजर, तसेच प्रसाद पुकळे, अनिकेत महाडिक, अजय नाईक, ललित जगताप, करण निंबरे, अनिरुद्ध गुजर, करण कुंभार, सुरज कुंभार, संकेत गुरव, गणेश घाडगे, शुभम घाडगे, सुरज कवडे, पवन पुकळे, प्रशांत सावंत, आकाश गायकवाड, कुणाल निंबरे, चिरंजीव शर्मा, गुलशन शर्मा आदी उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply