Breaking News

औषधविरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल; रोटरी क्लबचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर : पनवेल महानगरपालिका क्षेत्र व पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती क्षेत्रात औषधविरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल असा प्रकल्प डॉ. गिरीष गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी सर्व रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून त्याची प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरुवात करण्यात आली. 

एक चमचा कमी चार पावलं पुढे! हा आरोग्यमंत्र घेऊन रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि ग्रामपंचायत वलप यांच्या संयुक्त विद्यमाने, वलप व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. 23)वलप ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे माजी प्रांतपाल तथा प्रख्यात सर्जन, डॉ. गिरीष गुणे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्त शर्करा, रक्तदाब, बॉडी मास इंडेक्सची मोफत तपासणी करण्यात आली. या वेळी अनेक डॉक्टर, मान्यवर, रोटेरियन्स, रोटरी ऍन, ग्रामपंचायतीचे सदस्य व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply