Breaking News

दहिवली रस्त्याचे काँक्रीटीकरण करा; अन्यथा ठिय्या आंदोलन; भाजपचा इशारा

कर्जत : बातमीदार

नगर परिषद हद्दीतील दहिवली येथील द. पा. डोंबे विद्यालय ते श्रीराम पूल या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्जत येथील उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दहिवलीतील डोंबे विद्यालय ते श्रीराम पूल या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. कर्जत शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे करण्यात आली, मात्र सदरचा रस्ता कायमच दुर्लक्षित राहिला आहे. या खराब रस्त्यामुळे नागरिकांना, शाळेत ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांना, पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित डागडुजी करावी, अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्जत येथील उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांना देण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्यासह भाजप जिल्हा सरचिणीस दीपक बेहेरे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, मंदार मेहेंदळे, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply