पनवेल : प्रतिनिधी : पनवेलमध्ये रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला 650 नागरिकांनी या शिबिरात आपली तपासणी करून घेतली.
पनवेलमधील 52 बंगलो येथे जनजागृती ग्राहक मंच, पनवेल तालुका निवृत सेवक संघ, अंकुल फाऊंडेशन मोरबे आणि वेदिक आयूर क्युयर हेल्थ आणि रिटेल्स प्रा. ली. यांनी रविवारी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. आयूर क्युयर हेल्थ आणि रिटेल्स प्रा. ली. ही कंपनी 2003 पासून 2018 परिणत ट्रेडिशनल व्यवसाय करीत होती. कंपनीचे सीएमडी डॉ. फैजानं खान यांनी वेदाबद्दल समाजात जागृती करण्यासाठी जानेवारी 2018मध्ये कंपनीला मल्टीलेवल मार्केटिंगमध्ये आणले. त्यातून लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी रेणूका पन्हाळे, बी. पी. म्हात्रे, संतोष पवार आणि रवींद्र पगारे यांनी मेहनत घेतली. रेणूका पन्हाळे यांनी बेरोजगार युवक-युवती आणि महिलांनी रोजगार हवा असल्यास रेणूका पन्हाळे 9920733878 किंवा म्हात्रे 9819606693 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.