Breaking News

सरकारच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा सुनील तटकरेंचा डाव भाजप नेते कृष्णा कोबनाक यांचा हल्लाबोल

म्हसळा : रामप्रहर वृत्त

रक्षाबंधन पर्व- नारी शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त म्हसळा तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 13) येथील  कुणबी समाज सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यात म्हसळा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजप सरकारने सुरू केलेल्या महिला बचत गट, बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या योजना, मातृ वंदन योजना, पंतप्रधान उज्वला गॅस योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना अशा विविध योजनांबद्दल या मेळाव्यात माहिती देण्यात आली.

 या मेळाव्यात मार्गदर्शन करताना  श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे भाजप अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णा कोबनाक यांनी  खासदार सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. माणगाव म्हसळा रस्त्याचे सुरू असलेले काम सरकारच्या ग्रामसडक योजने अंतर्गत सुरू आहे. तसेच रोहा ते दिघी रेल्वेमार्गही भाजप सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असल्याचे कोबनाक यांनी ठासून सांगितले. त्यामुळे या विकासकांचे श्रेय अन्य कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये, असा हल्लाबोल कृष्णा कोबनाक यांनी यावेळी केला. तटकरे दावा करत असलेली सगळी विकासकामे ही भाजप सरकारच्याच माध्यमातून झाली असल्यामुळे तटकरेंनी जनतेची फसवणूक थांबवावी असेही कोबनाक म्हणाले.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ महिला संयोजक हेमा मानकर, सहसंयोजक यशोधरा गोडबोले, म्हसळा पं.स. च्या माजी सदस्या  प्रियांका शिंदे तसेच रुपाली भायदे, धनश्री मुंडे, कल्पना कोठावले, आशा पाटील यांच्यासह म्हसळा तालुक्यातील सर्व मंडळ पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply