Breaking News

बलात्कारपीडितेशी लावले पतीचे लग्न

कर्नाटक ः वृत्तसंस्था

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पीडित मुलीशीचीच पतीचे लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

आरोपी गंगाराजू याची गावातील तरुणी पल्लवीशी मैत्री होती. गंगाराजू पेंटरचे काम करीत होता. पल्लवी आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. काही महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केले होते. पल्लवीची 13 वर्षीय चुलत बहीण त्यांच्याकडे राहण्यासाठी आली होती. गंगाराजूने तिच्यावर बलात्कार केला आणि कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली, पण संपूर्ण गावात ही बातमी पसरली आणि चाइल्ड हेल्पलाइनला कळवण्यात आले. पीडित मुलीची चौकशी करण्यात आली असता तिने आधी असे काहीच झाले नसल्याचे सांगितले. परिस्थिती चिघळत चालली असल्याचे पाहिल्यानंतर पल्लवीने पतीसोबत पीडित मुलीचे लग्न लावून दिले. चाइल्ड लाइनकडे याचीही तक्रार करण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा मुलीकडे चौकशी करण्यात आली. या वेळी मुलीने संपूर्ण घटनेची माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी गंगाराजू आणि त्याची पत्नी पल्लवीला अटक केली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply