Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते न्यू लूक सल्लोन अॅण्ड स्पा शॉपचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर

खारघरमध्ये लक्ष्मी खिर्डीकर व त्यांचे पती दिनेश खिर्डीकर यांनी शहरात सेक्टर 12 या ठिकाणी न्यू लूक युनिसेक्स सल्लोन अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमीची सुरुवात केली आहे. या शॉपचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. दुकानाचा उद्घाटन सोहळा लक्ष्मी खिर्डीकर, त्यांचे पती दिनेश खिर्डीकर व अशरफ शेख यांच्या वतीने सद्गुरू पूजा व महाप्रसादाचे आयोजन करून नुकताच शॉप नं 08, मेहेक अपार्टमेंट, प्लॉट नं ए -17, सेक्टर 12 खारघर या ठिकाणी मोठ्या उत्साहात झाला. या वेळी भाजप खारघर शहराध्यक्ष  ब्रिजेश पटेल, माजी सभापती अभिमन्यू पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेविका लीना गरड, नगरसेवक रामजी बेरा, गुरुनाथ गायकर, रायगड जिल्हाध्यश शिरीष घरत, स्थानिक सर्व नगरसेवक,  नवी मुंबई शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply