Breaking News

केदार भगत मित्र मंडळातर्फे दीपोत्सव साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

आपल्या सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालेली आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करीत दिवाळी साजरी करीत आहोत, याचा मनापासून आनंद होत असल्याचे उद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे केदार भगत मित्र मंडळाने आयोजन केले होते.

कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या उत्सवाच्या अंतर्गत पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी केदार भगत मित्र मंडळाने दीपोत्सवाचे आयोजन गुरुवारी केले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. या वेळी त्यांनी सांगितले की आपण जी संस्कृती अभिमानाने जगतो त्या संस्कृतीचे प्रतिक म्हणजे प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्याला सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही महाराजांमुळे मिळालेली आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करीत दिवाळी साजरी करत आहोत याचा मनापासून आनंद होत आहे, तसेच केदार भगत मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या दीपोत्सव कार्यक्रमास नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, युवा नेते केदार भगत आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply