दुबई : वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली अपयशी ठरला. या खराब कामगिरीनंतरही विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील दुसरे स्थान कायम राहिले आहे.
क्रमवारीत कोहलीने दुसरे स्थान कायम राखले असले तरी त्याला 20 गुणांचा फटका बसला आहे. त्याच्या गुणांची संख्या 906 वरून 886 झाली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 911 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले, तर ऑस्ट्रेलियाचाच मार्नस लॅबुशेन 827 गुणांसह तिसर्या स्थानावर आहे. त्याने केन विलियम्सनला (813) चौथ्या स्थानी ढकलले.
दुसरीकडे जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत साजेशी कामगिरी करता आली नसली तरी त्याने चार स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंडचा टीम साऊदी चौथ्या स्थानी आला आहे, तर ट्रेंट बोल्ट टॉप टेनमध्ये परतला. याउलट भारताचा फिरकीपटू अश्विन टॉप टेनमधून बाहेर फेकला गेला आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …