पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे नेरूळ येथील गावदेवी मैदानात राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग महापौर चषक स्पर्धेचे आयोजन सोमवारी (दि. 2) करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पीटी शिक्षिका सरस्वती कोराडे (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या) यांनी सहभाग घेऊन 57 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी कोराडे यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
Check Also
कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper