Breaking News

वसीम जाफरचा क्रिकेटला अलविदा

मुंबई : प्रतिनिधी
रन मशिन अशी ओळख असणार्‍या वसीम जाफरने शनिवारी (दि. 7) क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. रणजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम जाफरच्या नावावर आहे. तो आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिल 2008मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
तंत्रशुद्ध सलामीवीर अशी वसीम जाफरची ओळख होती. मुंबईकडून रणजी करंडक खेळताना जाफरने धावांची टाकसाळ उघडली होती. त्यानंतर भारतीय संघातही त्याची निवड करण्यात आली होती. भारताकडून जाफरने 31 कसोटी सामन्यांत 1944 धावा केल्या होत्या. यामध्ये पाच शतकांसह 11 अर्धशतकांचा समावेश होता. वेस्ट इंडिजविरुद्ध 2016 साली जाफरने 212 धावांची सर्वोत्तम खेळी साकारली होती. भारताकडून दोन एकदिवसीय सामनेही वसीम खेळला.
स्थानिक क्रिकेटमध्ये वसीम जाफर हा संघाच्या फलंदाजीचा कणा मानला जायचा. प्रत्येक संघासाठी सलामी महत्त्वाची असते आणि जाफर हा बहुतांश वेळा संघाला दमदार सलामी करून द्यायचा. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील 12 हजार धावांचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याचबरोबर 260 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने 50.67च्या सरासरीने 19,110 धावा केल्या आहेत. जाफरच्या नावावर 57 शतके आणि 91 अर्धशतके आहेत.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply