Breaking News

खोपोलीतील गटारांची कामे धिम्या गतीने

सांडपाणी तुंबल्याने परिसरात दुर्गंधी

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्ग खोपोली शहरातून जातो. सध्या या महामार्गाच्या रूंदीकरणाबरोबरच दुतर्फा गटारांचीही कामे सुरु आहेत. मात्र ही कामे ठेकेदाराकडून धिम्या गतीने सुरु आहेत. कामे रखडल्यामुळे गटारे तुंबून महामार्गालगतच्या गिरनार, शास्त्री नगर परिसरात दुर्गंधी सुटून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मात्र त्यावरून नगरपालिका व महामार्ग ठेकेदार यांच्यात तू तू मै मै  सुरू असून, त्यात नागरिक नाहक भरडले जात आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘स्वच्छ खोपोली‘ यावर नगरपालिका प्रशासान भर देत असले, तरी महामार्गावरील तुंबलेल्या गटारांचा प्रश्न एरणीवर आला आहे. शहरातील मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, एमएसआरडीसीच्या  माध्यमातून दुतर्फा गटारांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहारातील शास्रीनगर परिसरातील युनियन बँक, गिरनार बिल्डींग आदी भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी महामार्गालगत गटार आहे. या गटारांची कामे धिम्यागतीने सुरु असून, या गटारांतून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ते तुंबून परिसरात दुर्गंधी सुटली आहे. तसेच डासांचा प्रार्दुभावही वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुंबलेली गटारे साफ करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे, मात्र नगरपालिका प्रशासन ही जबाबदारी महामार्ग ठेकेदारावर टाकत आहे, तर या गटारांच्या कामांचे ठेकेदार कामाच्या ठिकाणी उपस्थित रहात नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. यावर नगरपालिकेने तोडगा काढणे जरुरीचे असताना आरोग्य विभाग कानावर हात ठेवत असल्याने नागरिकांना दुर्गधीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply